(मुंबई)
मुंबई विद्यापीठामार्फत हिवाळी सत्र २०२५ मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहेत. सर्व शाखांमधील परीक्षा आणि अर्ज सादर करण्यासंबंधीचा तपशील विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://mu.ac.in/wp-content/uploads/2025/06/Exam-Submission-Form.pdf या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वाणिज्य व व्यवस्थापन शाखा – परीक्षा ७ ऑक्टोबरपासून
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत पदवी स्तरावरील तृतीय वर्ष (सत्र ५) अभ्यासक्रम –
बी.कॉम, बी.कॉम (फायनान्शिअल मार्केट), बँकिंग अॅन्ड इन्श्युअरन्स (BBI), अकाऊंटिंग अॅन्ड फायनान्स (BAF), इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आणि बीएमएस या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान शाखा – परीक्षा १४ ऑक्टोबरपासून
बीएस्सी, बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बायोटेक्नॉलॉजी, आयटी आणि डेटा सायन्स या अभ्यासक्रमांच्या तृतीय वर्ष सत्र ५ च्या परीक्षा १४ ऑक्टोबर २०२५ पासून घेण्यात येणार आहेत.
🗓 परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत:
१५ जुलै ते ८ सप्टेंबर २०२५
मानव्यविज्ञान शाखा – परीक्षा १४ ऑक्टोबरपासून
बी.ए. आणि बीएमएमसी (सत्र ५) या अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होतील.
🗓 अर्ज सादर करण्याची मुदत:
१५ जुलै ते ३० ऑगस्ट २०२५
कायदा शाखा – परीक्षा ३ डिसेंबरपासून
एलएल.बी. (तीन वर्षे) सत्र ५ आणि एलएल.बी. (पाच वर्षे) सत्र ९ या परीक्षा ३ डिसेंबर २०२५ पासून आयोजित करण्यात आल्या आहेत.
🗓 परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत:
१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५
एमसीए परीक्षा – नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये
विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील एमसीए (सत्र १) ची परीक्षा १० नोव्हेंबर २०२५ पासून आणि एमसीए (सत्र ३) ची परीक्षा २ डिसेंबर २०२५ पासून घेतली जाणार आहे. पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक देखील विद्यापीठाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमार्फत वेळेत अर्ज सादर करून तयारीला लागावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. संपूर्ण वेळापत्रक व अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

