(मुंबई)
चिपळूण तालुक्यातील नद्यांमध्ये अनधिकृतपणे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या safist कंपनी आणि टँकरमाफियांचा गंभीर मुद्दा आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात अत्यंत ठामपणे मांडला.
नियमबाह्य टँकर रात्रीच्या वेळी गावात येऊन नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडतात, ज्यामुळे केतकी, करबवणे, मालदोली, भिले या भागातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. रापण टाकून मासेमारी करणाऱ्या स्थानिकांच्या उदरनिर्वाहावर गदा आली असून, त्यांच्या व्यवसायावरच गंडांतर ओढवलं आहे, असे निकम यांनी स्पष्ट केले.
“या कंपन्यांकडून नुकसान भरपाईचे धोरण आखावे, आणि स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी मीटिंग घेण्याची तयारी आहे का?” – असा थेट प्रश्न आमदार निकम यांनी उपस्थित केला.
यावर मंत्री श्रीम. पंकजाताई मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

