(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी) येथे विद्यार्थ्यांसाठी भात रोपांची काढणी व लावणी यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमात सहशिक्षक श्री. मसरत शेख, श्रीमती शारदा गुरव व श्रीमती वर्षा गुरव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आनंदाने या शैक्षणिक उपक्रमात भाग घेतला. पारंपरिक शेती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे मुलांचे शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता वास्तवाशी जोडले गेले. शाळेने शैक्षणिक चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना नव्या गोष्टी शिकविण्याचा घेतलेला प्रयत्न गावकऱ्यांनीही कौतुकाने पाहिला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो :
जि.प. प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथील विद्यार्थ्यांना भाताची रोपे काढणे व लावणे याचे प्रात्यक्षिक दाखवताना मुख्याध्यापक श्री. संतोष मुडे, श्रीमती शारदा गुरव व श्रीमती वर्षा गुरव.
(छायाचित्र: दिनेश पेटकर, गावखडी)

