फेब्रुवारी आणि मार्च 2026 हा काळ धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. अवघ्या 15 दिवसांच्या अंतरात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार असून, त्यातही होळीच्या सणावर खग्रास चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026
2026 मधील पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी फाल्गुन अमावस्येला होणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल.
-
ग्रहण सुरू होण्याची वेळ: दुपारी 3.26
-
ग्रहण समाप्ती: सायंकाळी 7.57
-
सुतक काळ: 12 तास आधी म्हणजे पहाटे 3.26 पासून
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या त्याचा थेट प्रभाव मानला जात नसला, तरी ज्योतिषीय परिणामांची चर्चा सुरू आहे.
होळीच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण
विशेष लक्ष वेधून घेणारी घटना म्हणजे होळीच्या सणावर, म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे.
-
चंद्रग्रहण वेळ: दुपारी 3.19 ते सायंकाळी 6.47
-
पूर्ण खग्रास अवस्था: सुमारे 17 मिनिटे
-
हे उदित चंद्रग्रहण असेल आणि भारतात स्पष्टपणे दिसेल
2 मार्चच्या रात्री होलिका दहन होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी चंद्रग्रहण येत असल्याने भद्रा आणि ग्रहणाचा दुर्मिळ योग तयार होत आहे.
15 दिवसांत दोन ग्रहणे, काय संकेत देतात?
काही ज्योतिषांच्या मते, इतक्या कमी कालावधीत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणे असामान्य मानले जाते. यामुळे खालील गोष्टी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे:
-
शेअर बाजारात मोठी चढउतार किंवा घसरण
-
आगीच्या घटना वाढण्याची शक्यता
-
भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती
-
सामाजिक असंतोष आणि मोठी आंदोलने
-
दोन देशांमध्ये तणाव किंवा युद्धसदृश परिस्थिती
-
सत्तारचनेत बदल आणि वरिष्ठ नेत्यांबाबत दुःखद बातम्या
मात्र काही ज्योतिषी याला नैसर्गिक खगोलीय घटना मानत असून, घाबरण्याचे कारण नसल्याचेही सांगतात.
ग्रहण काळात काय करावे?
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी योग्य मानला जातो.
-
देवाच्या मंत्रांचा जप करावा
-
नामस्मरण आणि ध्यान करावे
-
ग्रहण काळात सूर्य किंवा चंद्राकडे थेट पाहू नये
-
मंदिरात दर्शन आणि मूर्ती स्पर्श टाळावा
काय करू नये?
-
ग्रहण काळात दिवसा झोपणे टाळावे
-
ग्रहणापूर्वी तयार केलेले अन्न ग्रहणानंतर वापरू नये
-
बाहेर जाऊन ग्रहण पाहणे टाळावे
गर्भवती महिलांसाठी विशेष सूचना
-
ग्रहण काळात घराबाहेर जाणे टाळावे
-
मंत्रजप करणे शुभ मानले जाते
-
आरोग्याच्या कारणास्तव फळे, सात्विक अन्न आणि औषधे घेण्यास हरकत नाही
ग्रहणाच्या दिवशी होळी कशी साजरी करावी?
ज्योतिषांच्या मते, 3 मार्च रोजी पाण्याने होळी खेळणे टाळावे.
-
फक्त गुलाल किंवा सुक्या रंगांनी होळी खेळावी
-
यामुळे ग्रहण दोष लागत नाही आणि धार्मिक परंपराही अबाधित राहते
फेब्रुवारी–मार्च 2026 मधील ग्रहणयोगामुळे धार्मिक, सामाजिक आणि ज्योतिषीय चर्चांना उधाण आले आहे. श्रद्धा, शास्त्र आणि सावधगिरी यांचा समतोल राखत सण साजरे करणे आणि अनावश्यक भीती टाळणे, हाच तज्ज्ञांचा सल्ला आहे.

