(मुंबई)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी २७ जून ही अंतिम तारीख होती, मात्र विद्यार्थीहित लक्षात घेऊन व कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यापीठाने ही निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या सूचना आणि प्रवेश प्रक्रिया:
- प्रवेशासाठी ऑनलाईन नावनोंदणी अनिवार्य असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
- ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करणे देखील बंधनकारक आहे.
- महाविद्यालयांनी सामान्य गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, आणि जर जागा रिक्त राहिल्यास नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेश द्यावा, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राबवण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया:
महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या निर्णयानुसार, खालील अभ्यासक्रमांत प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे:
-
३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
-
४ वर्षांचा ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रम
-
५ वर्षांचा इंटिग्रेटेड प्रोग्राम (Multiple Entry & Exit पर्यायांसह)
प्रवेशासाठी उपलब्ध अभ्यासक्रमांचा विस्तृत यादी
-
कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम:
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस्सी. (आयटी), बी.एस्सी. (कंप्युटर सायन्स), बी.एम.एस., बी.ए.एम.एम.सी. -
व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम:
बी.कॉम. (बँकिंग/ फायनान्स/ मॅनेजमेंट स्टडीज), बी.व्होक., बी.एम.एस.-एम.बी.ए. (इंटिग्रेटेड) -
विशेष अभ्यासक्रम:
बी.ए. (फ्रेंच/ जर्मन स्टडीज), बी.म्युझिक, बी.पी.ए. (डान्स/ म्युझिक), एफ.वाय.बी.एस्सी. (बायोएनॅलिटिकल सायन्स), बी.लायब्ररी सायन्स, बी.व्होक. (हॉस्पिटॅलिटी, टुरिझम, फार्मा अॅनॅलिटिकल इ.) -
इतर व्यावसायिक अभ्यासक्रम:
बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, एरोनॉटिक्स, मेरिटाइम, एव्हिएशन, डेटा सायन्स इ.)