(नवी दिल्ली)
पदवी (Undergraduate) आणि पदव्युत्तर (Postgraduate) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) कडून विद्यार्थ्यांसाठी ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स (CSSS)’ ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
- पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- पदवीच्या पहिल्या तीन वर्षांसाठी दरवर्षी ₹12,000 इतकी शिष्यवृत्ती.
- पदव्युत्तर शिक्षणासाठी दरवर्षी ₹20,000 इतकी रक्कम मिळणार.
- ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
- विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (https://scholarships.gov.in/) जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२५
- अर्ज करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी आपले मूळ कागदपत्रे आपल्या महाविद्यालय/विद्यापीठात दाखवून अर्जाची पडताळणी करवून घेणे आवश्यक आहे.
- पडताळणी केल्याशिवाय कोणताही अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- नोडल अधिकारी विद्यार्थ्यांची पडताळणी वेळेत पूर्ण करतील, याची जबाबदारी महाविद्यालय किंवा विद्यापीठावर असेल.
सीबीएसईने विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सूचित केले आहे की, अर्ज करताना वेबसाईटवर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. अर्जात कोणतीही चूक झाल्यास तो नाकारण्यात येऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. CBSEच्या या शिष्यवृत्ती योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रांसह, दिलेल्या वेळेत आणि अचूक माहितीने अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा.