(जैतापूर / राजन लाड)
सागरी महामार्गावरील नाटे-जेतापूर उतारावर आज (सोमवार) सकाळी एका टँकरचे ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्यातच अडकले. यामुळे या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, लहान चारचाकी वाहनांना मात्र मार्गक्रमणासाठी मुभा देण्यात आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, टँकर हटवण्यासाठी क्रेन आणि जेसीबी मागविण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, रस्ता पूर्णपणे खुला होण्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे सुचविण्यात आले आहेत:
🔹 रत्नागिरीहून देवगडकडे जाणारी वाहने
→ धाऊलवली फाटा → जाकादेवी मार्ग → जैतापूर
🔹 जैतापूर पुलावरून रत्नागिरीकडे येणारी वाहने
→ धाऊलवली → जाकादेवी → धारतळे मार्ग
वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.