( चिपळूण )
महाराष्ट्रातील आद्य आणि प्रतिष्ठित साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे यांची, तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकतीच शाखेची सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे :
अध्यक्ष: प्रा. संतोष गोनबरे
कार्याध्यक्ष: धीरज वाटेकर
उपाध्यक्ष: प्रा. सोनाली खर्चे, मनिषा दामले
कार्यवाह: प्राची जोशी
कोषाध्यक्ष: प्रकाश घायाळकर
समित्या :
स्पर्धा समिती: रविंद्र गुरव, प्रदीप मोहिते, दीपक मोने
कार्यक्रम समिती: शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी, समीर कोवळे, कैसर देसाई
वाङ्मय समिती: मुझफ्फर सय्यद, महम्मद झारे, स्नेहा ओतारी
महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. चिपळूण शाखेच्या वतीने येत्या काळात विविध साहित्यिक स्पर्धा, चर्चासत्रे, वाचन उपक्रम यांचे आयोजन करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस मसापचे कोकण विभाग प्रतिनिधी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, भाषातज्ज्ञ व समीक्षक अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, तसेच लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.