रुद्रप्रयाग (उत्तराखंड)
चारधाम यात्रेच्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. बद्रीनाथ महामार्गावरील घोलथिरजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचे नियंत्रण सुटून ते थेट खोल दरीत कोसळले आणि खवळलेल्या अलकनंदा नदीत जाऊन पडले. या भीषण दुर्घटनेत प्रवाशांचे जीवित नुकसान झाले असून अनेक प्रवासी गंभीर जखमी तर काहीजण अजूनही बेपत्ता आहेत.
दुर्घटनेच्या वेळी वाहनात एकूण २० प्रवासी होते. यामध्ये ८ जण जखमी, ३ प्रवाशांचा मृत्यू, तर उर्वरित ९ जण बेपत्ता असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि हरिद्वार येथील नागरिकांचा समावेश आहे. ही टेम्पो ट्रॅव्हलर चारधाम यात्रेसाठी निघाली होती.
प्रशासनाकडून घटनास्थळी SDRF, NDRF आणि DDRF पथकांच्या सहाय्याने युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू आहे. गंभीर जखमींपैकी दोघांना हेलिकॉप्टरने एम्स ऋषिकेश येथे हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर श्रीनगर व रुद्रप्रयाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील जखमी प्रवाशांची यादी:
1. दीपिका सोनी (वय ४२), सिरोही मीना वास, राजस्थान
2. हेमलता सोनी (वय ४५), प्रताप चौक, गोगुंडा, राजस्थान
3. ईश्वर सोनी (वय ४६), पर्वत सिलिकॉन पॅलेस, गुजरात
4. अमिता सोनी (वय ४९), मीरा रोड, ठाणे, महाराष्ट्र
5. भावना सोनी (वय ४३), पर्वत सिलिकॉन पॅलेस, गुजरात
6. भव्य सोनी (वय ७), पर्वत सिलिकॉन पॅलेस, गुजरात
7. पार्थ सोनी (वय १०), राजगड, मध्य प्रदेश
8. सुमित कुमार (ड्रायव्हर), बैरागी कॅम्प, हरिद्वार
बेपत्ता प्रवाशांची यादी:
1. रवी भावसार (वय २८), उदयपूर, राजस्थान
2. मौली सोनी (वय १९), पर्वत सिलिकॉन पॅलेस, गुजरात
3. ललितकुमार सोनी (वय ४८), प्रताप चौक, गोगुंडा, राजस्थान
4. गौरी सोनी (वय ४१), राजगड, तहसील सदरपूर, मध्य प्रदेश
5. संजय सोनी (वय ५५), शास्त्री सर्कल, उदयपूर, राजस्थान
6. मयुरी (वय २४), सुरत, गुजरात
7. चेतना सोनी (वय ५२), उदयपूर, राजस्थान
8. चेष्टा (वय १२), पर्वत सिलिकॉन पॅलेस, गुजरात
9. कट्टा रंजना अशोक (वय ५४), मीरा रोड, ठाणे, महाराष्ट्र
10. सुशीला सोनी (वय ७७), उदयपूर, राजस्थान
मृत्यूमुखी पडलेले प्रवासी
विशाल सोनी, मध्य प्रदेश
दिमी (महिला), सुरत, गुजरात
(तिसऱ्या मृत व्यक्तीची अधिकृत ओळख अद्याप स्पष्ट नाही.)
ही दुर्घटना रुद्रप्रयागहून बद्रीनाथकडे जात असताना घडली. वाहनाने वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन थेट दरीत कोसळले. स्थानिक प्रशासन, बचाव पथके व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध जलदगतीने घेतला जात आहे.