(दापोली)
तालुक्यातील टाळसरे-तीलेवाडी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय संगीता कुमारी तुलेश्वर कुमार मेहता या तरुणीने राहत्या खोलीतील पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
२३ जून रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गंभीर अवस्थेत असलेल्या संगीतालाच तातडीने खाजगी अॅम्ब्युलन्सद्वारे दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद (आमृ. क्रमांक ४५/२०२५) दापोली पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ (BNSS) च्या कलम १९४ अंतर्गत करण्यात आली आहे.
संगीता कुमारी ही मूळची बिहारची असून, काही काळापासून ती टाळसरे परिसरात वास्तव्यास होती. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.