(जैतापूर / वार्ताहर)
येथील प्रतिष्ठित नागरिक सुभाष राजाराम दांडेकर यांच्या पत्नी सौ. स्मिता सुभाष दांडेकर (वय ७३) यांचे गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. जैतापूरमधील वाडी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सौ. स्मिता दांडेकर या जैतापूर येथील प्रसिद्ध डेकोरेटर्स ‘स्प्लॅश आर्ट्स अकॅडमी’चे संचालक तसेच जैतापूरमध्ये प्रथमच ‘डिलाईट होमस्टे’ सुरू करणारे मालक राकेश दांडेकर यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात पती सुभाष दांडेकर, एक मुलगा, दोन मुली, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जैतापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


