( रत्नागिरी )
बसणी (ता. रत्नागिरी) येथील ५५ वर्षीय जयवंत महादेव नाचणकर यांचा श्वसनास त्रास होऊन उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी रात्री उशीरा घडली असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
माहितीनुसार, मयत जयवंत नाचणकर हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने बसणी येथील डॉ. राणी मयेकर यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना त्वरित जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला.
रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून रात्री १०.१० वाजता मृत घोषित केले. या आकस्मिक मृत्यूची नोंद आमृ. क्रमांक ४८/२०२५ अन्वये बी.एन.एस.एस कलम १९४ प्रमाणे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.