(रत्नागिरी)
मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे १४ जून सकाळी १० वाजता महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान करा.. मानवधर्म वाढवा” या सामाजिक संदेशासह सामाजिक बांधिलकीचे भान राखून या उपक्रमात जास्तीत जास्त रत्नागिरीकरानी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी केले आहे.