(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता अभिषेक, दुपारी 12 वाजता पालखी प्रदक्षिणा व 12.30 वाजता आरती असा कार्यक्रम पार पडला. दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता भजन बुवा श्री वासुदेव वाघे (पूर्णगड) यांचे भजन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी श्री सहदेव पावसकर तसेच भाविक भक्तगण यांनी मोठे परिश्रम घेतले.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

