( रत्नागिरी )
खेड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस फौजदार म्हणून कार्यरत असलेले श्री. रविंद्र तुकाराम शिंदे यांची कन्या कुमारी जान्हवी रविंद्र शिंदे हिची भारतीय वायुसेनेत निवड झाली असून ती १ ऑक्टोबर २०२५ रोजी “फ्लाइंग ऑफिसर” म्हणून रुजू होणार आहे.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन कुमारी जान्हवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोईर उपस्थित होते.
कुमारी जान्हवीच्या या उत्तुंग भरारीमुळे रत्नागिरी पोलीस दलासह जिल्ह्याला अभिमान वाटत असल्याची भावना यावेळी श्री बगाटे यांनी व्यक्त केली.

