(राजापूर / तुषार पाचलकर)
दिनांक 10/10/2024 रोजी बाभळगांव, जिल्हा लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 66 पुरुष नव प्रविष्ट पोलीस शिपाई तसेच तुरची, जिल्हा सांगली येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 45 महिला नव प्रविष्ट पोलीस शिपाई तसेच दिनांक 11/12/2024 रोजी 1 नव प्रविष्ट पोलीस शिपाई, चालक पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाणविज, दौंड येथे मूलभूत पोलीस प्रशिक्षणाकरिता रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत पाठविण्यात आलेले होते. आपल्या मूलभूत पोलीस प्रशिक्षणाचा कालावधी संपूर्ण करून सर्व 112 नव प्रविष्ट पोलीस शिपाई हे दिनांक 10/06/2025 रोजी रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे हजर झाले.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व 112 नव प्रविष्ट पोलीस शिपाई यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सर्वांना आपल्या कर्तव्याप्रति समर्पण आणि शिस्त राखणे, सोशल मीडियावर योग्य वर्तन राखणे, योग्य व स्मार्ट पोलिसिंग करणे आणि सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडण्याबाबत व उपग्रेड होण्याबाबत अवगत केले तसेच वेळोवेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच महिला नव प्रविष्ट पोलीस शिपाई श्रीमती. कोमल सावते यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची जिल्हा सांगली येथे “सर्वोत्तम कमांडो कोर्स प्रशिक्षणार्थी” व महिला नव प्रविष्ट पोलीस शिपाई श्रीमती. अंजली यादव यांना “सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी” म्हणून ट्रॉफी संपादन केल्या बद्दल विशेष अभिनंदन केले.
या वेळी अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी देखील सर्व 112 नव प्रविष्ट पोलीस शिपाई यांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे नाव आपल्या कर्तुत्वातून उचवण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा करिता पोलीस उपअधीक्षक (पो. मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय श्री. राजेंद्र कुळसंगे, पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी, पोलीस कवायत प्रशिक्षक पोलीस हवालदार श्री. सावंत, पोलीस हवालदार श्री. सार्दळ व अंमलदार उपस्थित होते.