(मंडणगड)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. सुतारवाडी (कोलाड) येथे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात पुनर्प्रवेश केला.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, अजय बिरवटकर, भाई पोस्टुरे, मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, महेश केकाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधना बोथरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी, संदीप राजपूरे, तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, हरेश मर्चडे, सतीष दिवेकर, प्रकाश भुवड, पराग करमरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मंडणगड तालुकाध्यक्ष सुभाष सापटे, उपाध्यक्ष फौरोज उक्ये, अरुण घोसाळकर, हसरत खोपटकर, दिनेश साखरे, सुभाष शिगवण, माजी सरपंच शुभांगी शिगवण, शंकर खेराडे, गणेश सावर्डेकर, पुंडलीक सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पक्षात दाखल झाले.
या वेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले, “मुळ विचारधारेला न सोडता गेल्या दोन वर्षांत विकासाचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. शिगवण यांचा पुनर्प्रवेश हा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीचा परिणाम आहे.”
या पक्षप्रवेशामुळे मंडणगड तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.