(मंडणगड)
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारे, तालुका मंडणगड येथील इयत्ता पहिली चा विद्यार्थी कु. प्रित सचिन भोईर याने उत्तुंग यश मिळवले आहे. राज्य स्तरीय घेण्यात आलेल्या गुरुकुल परीक्षेत १०० पैकी १०० मार्क्स, ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत १०० पैकी ९६ मार्क्स मिळवून देशात ३२ वा, एमटीएस ऑलिंपियाड परीक्षेत १५० पैकी १४६ मार्क्स मिळवून गोल्ड मेडल+ट्रॉफी तसेच मंथन परीक्षेत १५० पैकी १४२ मार्क्स मिळवून राज्यात ५ वा क्रमांक आला आहे.
त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा देव्हारे च्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. प्रित ला वर्गशिक्षिका श्रीमती. फुंदे मॅडम यांचे तसेच शाळेतील शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कोणत्याही प्रकारची अतिरिक्त शिकवणी न लावता शाळेत शिकवलेला अभ्यास तसेच घरी पालकांनी घेतलेल्या अभ्यासाच्या जोरावर प्रित ने एवढे उत्तुंग यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.