(मंडणगड)
मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे या महिन्यातील दुसरा अपघात घडला असून डिझेल टँकरचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
येथील पाट परिसरातून येणाऱ्या मार्गावर बाईकस्वार देव (पूर्ण नाव कळू शकले नाही) आणि प्रेमल भोजने यांना टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून, प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती आहे. धडक दिलेला डिझेल टँकर हा अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीचा असल्याचे समजते आहे.
अपघात करून फरार झालेल्या टँकर चालकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार तेजेस मोरे, तुकाराम पारधी, एएसआय राजेंद्र माळी, महिला पोलीस वैशाली सुकाळे यांच्याकडून सुरू आहे.

