(मुंबई)
शिवसेना उबाठा पक्षाने नव्या चार उपनेत्यांची नियुक्ती जाहीर केली. नाशिकचे दत्ता गायकवाड, जळगावचे गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांना उपनेतेपदावर संधी देण्यात आली आहे.
राज्यात दिवाळीच्या आसपास महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना बांधणीवर भर दिला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नव्या उपनेत्यांच्या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. पक्षाने गुलाबराव वाघ यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.