(नवी दिल्ली)
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी गाझाबाबतच्या ब्लू प्रिंटबाबत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी इराणला इशारा दिला.
ट्रम्प म्हणाले, जर तेहरानने मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी परिणामांना सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. जर इराणने मला मारण्याचा प्रयत्न केला तर तेच नष्ट होतील, असंही ट्रम्प म्हणाले. इराणचे पृथ्वीवर काहीही शिल्लक राहणार नाही. इराण पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश मी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
जर डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या झाली तर अशा परिस्थितीत उपाध्यक्ष जेडी व्हान्स राष्ट्रपती होतील. अमेरिकन सरकार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर वरिष्ट अधिकाऱ्यांना इराणकडून असलेल्या संभाव्य धोक्यावर लक्ष ठेवून आहे. गाझा संदर्भात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ५ कलमी आराखड्यात इराणचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी इराणचे कंबरडे मोडण्यासाठी एका कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. यामध्ये अमेरिकन सरकारला इराणवर जास्तीत जास्त दबाव आणण्यास सांगितले आहे.