( खेड )
खेड तालुक्यातील तिसंगी पिंपळवाडी येथील मदन भोसले यांच्याकडे भाड्याने राहणारी भारती कृष्णा जाधव (वय ३५) या महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ती झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती.
या अपघातात तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने तिला १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
२१ मे २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजता रत्नागिरी सिव्हिलमध्ये दाखल केल्यानंतर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वराज धारगळकर यांनी तपासणीअंती भारती जाधव यांना उपचारपूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात ३ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७:१६ वाजता आकस्मिक मृत्यू क्र. ४५/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

