(नाशिक)
नाशिकमध्ये 2026 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नान आणि पर्वस्नानांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा तारखा :
– सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ – शनिवार 31 ऑक्टोबर 2026 दुपारी 12.02 मिनिटे (ठिकाण – रामकुंड पंचवटी नाशिक)
– साधुग्राम ध्वजारोहण शनिवार, 24 जुलै 2027आखाडा ध्वजारोहण, आषाढ, कृ. पंचमी
– नगर प्रदक्षिणा गुरुवार, 29 जुलै 2027 आषाढ, कृ. एकादशी
– प्रथम अमृतस्नान सोमवार, 2 ऑगस्ट 2027 आषाढ, सोमवती अमावस्या
– महाकुंभ स्नान – द्वितीय अमृतस्नान मंगळवार, 31ऑगस्ट 2027 श्रावण, अमावस्या
– तृतीय अमृतस्नान शनिवार, 11सप्टेंबर 2027,भाद्रपद, शुद्ध एकादशी