(देवरूख / सुरेश सप्रे)
जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली (गवळवाडी) येथील श्रीसाईबाबा मंदीर नुतनीकरण व प्राण प्रतिष्ठान सोहळ्यासह संघाचा रौप्य महोत्सव वर्धापन दिन सोहळा दिमाखात पार पाडला.
दि. १२ मे रोजी साईबाबांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक फणसवणे विचारवाडी ते अंत्रवली गवळवाडी अशी मिरवणूक काढण्यात आली.
१३ मे रोजी मुर्तीची स्थापना करुन होम हवन करण्यात आले. १४ मे, २०२५ रोजी कलशारोहण करुन साई भंडारा घातला गेला. सायंकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक करण्यात आली. साईनााथ सेवासंघाचे अंत्रवली(गवळवाडी), ग्रामस्थ तसेच सर्व माहेरवाशीणी भगीनींनी बाबांच्या मिरवणूकीत सहभाग घेतला.
या रौप्य महोत्स्वी उत्सव पार पाडण्यासाठी मंडळ कमिटीचे गणपत दाभोळकर (उपाध्यक्ष, मुंबई), गणपत माईन (प्रमुख सल्लागार) संतोष कांबळे (प्रमुख सल्लागार), राघो खाडे (सचिव, मुंबई), गणपत डिके,चंद्रकांत माईन. रमेश कातकर. शांताराम महाडिक यांनी मेहनत घेतली. साईनाथ सेवा संघाचा रौप्य महोत्सवी वर्ष दणक्यात साजरे केले.