(संगमेश्वर)
राज्याचे उद्योगमंत्री ना. श्री उदय सामंत आणि राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार श्री किरण सामंत यांच्या माध्यमातून संगमेश्वर खाडी विभागातील फुणगुस पंचायत समिती गणामध्ये इमारत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप तसेच मोफत आरोग्य शिबिराचे शिवसेना संघटना खाडी विभागच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. बांधकाम कामगार यांना midc गोडाऊन येथून भांडी आणावी लागत होती. मात्र प्रचंड उन्हाळा असल्याने, होणारी गर्दी आणि वाहतूक खर्च लक्षात घेता श्री. सामंत यांच्या सूचनेनुसार खाडी विभागातील गावांसाठी परचुरी वेल्ये वाडी येथील श्री गणेश मंदिर प्रांगणात साहित्य वाटप आणि आरोग्य तपासणी करण्यात आले. सदर उपक्रमाचा लाभ पोचरी, देण, परचुरी, कोंडये, मेढे तर्फे फुनगूस, डावखोल, उपले, मांजरे आदी गावातील लाभार्थ्यांनी घेतला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, उपतालुकाप्रमुख परशुराम वेल्ये, विभागप्रमुख महेश देसाई, महिला विभाग प्रमुख श्रीमती पूनम देसाई, परचुरी सरपंच श्रीमती शर्वरी वेल्ये, पोचरी चे शाखा प्रमुख अक्षय देसाई, उपविभाग प्रमुख विश्वास घेवडे, उपविभाग संघटक दिनेश शितप, उपविभाग प्रमुख दीपक लिंगायत युवक विभागप्रमुख विश्वास दसम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार श्री.उदय सामंत आणि आमदार श्री.किरण भैया सामंत यांच्या या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ना.श्री. उदय सामंत यांचे स्वीय सहायक श्री नेताजी पाटील आणि कामगार मंडळ कार्यालयाचे जिल्हा आयुक्त श्री आयरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख श्री महेश देसाई आणि उपतालुकाप्रमुख श्री परशुराम वेल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोचरी गावचे शाखाप्रमुख अक्षय देसाई, परचुरी गावच्या सरपंच शर्वरी वेल्ये, परचुरी चे शाखाप्रमुख सुहास घाणेकर, कोंडये शाखाप्रमुख शैलेश शितप,युवक चे विभागप्रमुख विश्वास दसम, पोचरी चे युवक शाखाप्रमुख समीर सुवरे, देण चे युवक शाखा प्रमुख विशाल लोंढे, सतीश मुकनाक आणि परचुरी ग्रामस्थ आणि महिला मंडळ आणि गणेश प्रेरणा मंडळ परचुरी यांनी सहकार्य केले.