(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश हरिभाऊ अंब्रे यांची सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती (राष्ट्रीय) या संस्थेच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती समितीचे संस्थापक सदस्य श्री. सुरज भोईर यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली असून, नियुक्तीपत्र संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुरेश विठोबा साळवी आणि लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्या अध्यक्षा डॉ. वर्षाताई खानविलकर यांच्या शुभहस्ते श्री. अंब्रे यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास नावडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. मधुकर देवरुखकर उपस्थित होते.
हा छोटेखानी कार्यक्रम सावर्डे (डेरवण) येथे नुकताच पार पडला. श्री. दिनेश अंब्रे हे माजी सैनिक सुपुत्र असून नाभिक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते सध्या विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
कार्यक्रमादरम्यान पत्रकार मधुकर देवरुखकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुरेशदादा साळवी व लायन्स क्लब अध्यक्षा डॉ. वर्षाताई खानविलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या प्रसंगी मान्यवरांनी श्री. अंब्रे यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. दिनेश अंब्रे यांच्या या नियुक्तीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी, समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणार असा निर्धार श्री. अंब्रे यांनी व्यक्त केला.

