(रत्नागिरी)
उद्योग मंत्री, तथा पालकमंत्री, नाम. उदय सामंत, आम. किरण उर्फ भय्या सामंत यांच्या सूचनेनुसार मजगांव येते भांडी वाटप कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
बांधकाम कामगार यांना MIDC गोडाऊन येथून भांडी आणावी लागत होती. मात्र प्रचंड उन्हाळा असल्याने आणि होणारी गर्दी लक्षात घेता आणि भांडी वाहतूक खर्च लक्षात घेता ग्रामपंचायत मजगांव येथे 191 लाभार्त्यांना लाभ देण्यात आला. मजगांव, केळये, म्हमूरवाडी येथील ग्रामस्थानी लाभ घेतला.
या वेळी केळये ग्रामपंचायत सरपंच सौरभी पाचकूडवे, मजगांव सरपंच फैयाज मुकादम, उपसरपंच शरीफ उर्फ बाबू इबजी, हुसैन टेमकर,आरजू मुकादम, मुज्जू मुकादम, बरकत मुकादम. नजराना होडेकर, फिदयांन काझी, फराज मुकादम, फैझान धामस्कार, इमाद इबजी, बासित इब्जी , रिझवान सावकार, प्रदीप पाचकूडवे, संदीप नाखरेकर, नफिसा मुकादम, नुजहत नाकाडे, सायली नाखरेकर, प्रणय धुळप, विनोद नाखरेकर, ताजुद्दीन खलफे, गुलनार ठाकूर, रुयेफा काझी, तझीन मुकादम, समिना मुकादम, फाईजा मुकादम. आधी ग्रामस्थानी ऑनलाईन कामासाठी सहकार्य केले.
नामदार उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केळये, मजगांव गावातील ग्रामस्थानी उत्तम सहकार्य केले.