(रत्नागिरी)
रेशन कार्डचे १२ अंकी डिजिटलायझेशन होण्याचे काम अद्यापही प्रलंबित आहे. या प्रक्रियेमुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अनेक ज्येष्ठ नागरिक वंचित राहिले आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेट देत वस्तुस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर या कामाला गती मिळाली आहे.
विशेष कॅम्पचे आयोजन – २२ मे रोजी
ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तहसीलदार, रत्नागिरी यांच्या वतीने २२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शिवाजी नगर (नरहर वसाहत) येथील रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावे:
-
रेशन कार्ड
-
रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची आधार कार्डे
-
गॅस नोंदणी पुस्तक (पासबुक)
-
उत्पन्नाचा दाखला (असल्यास)
-
कुटुंबातील सदस्य दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र
सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला उपक्रम
या उपक्रमाचा लाभ केवळ संघाच्या सभासदांपुरता मर्यादित नसून, इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही ही सेवा उपलब्ध आहे, असे रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी स्पष्ट केले आहे. हा विशेष कॅम्प ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार असून, त्यांच्या विविध योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे.