(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तथागत भगवान बुद्धांच्या धम्मप्रचार परंपरेतील वर्षांवास प्रवचन मालिकेचा जिल्हास्तरीय सांगता समारंभ येत्या रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वेरवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील बुद्ध विहार परिसरात संपन्न होणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत संस्कार विभाग तसेच तालुका शाखा लांजा आणि ग्रामशाखा वेरवली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून, अध्यक्षस्थानी आद. विजय जाधव, उपाध्यक्ष (संस्कार विभाग प्रमुख) राहणार आहेत. जुलै महिन्यातील आषाढ पौर्णिमा (१० जुलै २०२५) पासून ते आश्विन पौर्णिमा (७ ऑक्टोबर २०२५) पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये बुद्धवचने आणि धम्मतत्त्वांवर आधारित प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.
या सांगता सोहळ्यात ‘धम्म आणि विज्ञान’ या विषयावर आद. अनंत सावंत, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक व सचिव, संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य हे प्रबोधनपर प्रवचन देणार आहेत. तसेच आद. एन.बी. कदम (जिल्हा सरचिटणीस) व आयु. प्रदीप जाधव (कोषाध्यक्ष) हे प्रमुख मार्गदर्शन करतील. या सोहळ्याला शरणपाल कदम (उपाध्यक्ष, संरक्षण विभाग), जनार्दन मोहिते (उपाध्यक्ष, प्रचार व पर्यटन विभाग), विजय कांबळे (कार्यालय सचिव), तानाजी कांबळे (संघटक) यांच्यासह जिल्हा पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध तालुक्यांतील अध्यक्ष आर.बी. कांबळे (लांजा), राहुल मोहिते (संगमेश्वर), सत्यवान जाधव (राजापूर), विजय मोहिते (रत्नागिरी), जयरत्न कदम (चिपळूण), विद्याधर कदम (गुहागर), अरुणकुमार मोरे (खेड), अनिल घाडगे (दापोली) व हर्षद जाधव (मंडणगड) हे विशेष उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ (सचिव, संस्कार विभाग) करतील, तर प्रास्ताविक विकास पवार सचिव (सचिव संस्कार विभाग) करतील. स्वागताध्यक्ष म्हणून आर.बी. कांबळे (अध्यक्ष, लांजा) आणि रविंद्र जाधव (अध्यक्ष, ग्रामशाखा वेरवली) कार्यभार सांभाळतील. या समारंभासाठी जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, मा. श्रामणेर, केंद्रीय शिक्षकवर्ग, सैनिक, उपासक-उपासिका बंधुभगिनी यांनी उपस्थित राहून धम्ममय सांगता सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.

