(खेड)
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड (ग्रामीण) च्या महिला अध्यक्षपदी ममता भुवड व उपाध्यक्ष पदी दीक्षा धाडवे (भेलसई), सिद्धी जाबरे (आंबये) तर सचिव पदी समृद्धी भुवड(भरणे), खजिनदार पदी साक्षी म्हादे (हेदली) व सहसचिव पदी अक्षरा कदम (तळे), सल्लागार म्हणून रेखा गीते यांची निवड करण्यात आली आहे.
नवंभारत हायस्कूल भरणे ता. खेड येथे कुणबी महिला मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघ प्रतिनिधी नवनीत पिंपरे, ग्रामीण सचिव सचिन गोवळकर, खजिनदार सुधीर वैराग, कुणबी युवा अध्यक्ष सुरज जोगळे, युवा सचिव मच्छिन्द्रनाथ मांजरेकर सर्व ग्रामीण व युवा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष सचिव, कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.
या कार्यकारणीमुळे खेड तालुक्यातील कुणबी महिलांचे प्रश्न, समस्या, त्यांचे संविधानिक हक्क व अधिकार, तसेच सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय सक्षमीकरणासाठी हे संघटन महत्वाचे ठरणार आहे. महिलांचे स्थानिक स्वराज संस्थेतील महिलांचे प्रतिनिधित्व व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे सक्षमीकरण करण्यास मदत होणार आहे.