(खेड)
राज्यात दीपावली मध्ये विश्वविक्रमी दुर्गोत्सव आयोजित करण्यासाठी सर्व महाराष्ट्रात गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवावी त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेने यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले होते. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बीजघर नंबर एक शाळेमध्ये केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक भाग्यश्री काणेकर यांच्या संकल्पनेतून शाळेचे समाजशास्त्र विषयाचे पदवीधर शिक्षक संदीप घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर व विजय सकपाळ यांच्या सहकार्याने मुलांनी किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान जंगम यांनी किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यासाठी सहकार्य केले.


