(संगमेश्वर)
तालुक्यातील कोंडगाव येथील आझाद मैदान परिसरात झाडीझुडपाच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका जुगारावर देवरुख पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी झालेल्या या कारवाईत ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र अर्जुन डाफळे (वय ३९, रा. वाणीवाडी, कोंडगाव) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. घटनेच्या वेळी डाफळे हा मटका जुगार चालवताना आढळून आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन भोंडवे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास देवरुख पोलिस करत आहेत.