(रत्नागिरी)
देवदर्शनासाठी कुटुंबासह रत्नागिरीत आलेल्या पर्यटक महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नीता नरेंद्र मेस्त्री (वय ४९, रा. नालासोपारा, पालघर; मूळ गाव – देवाचे गोठणे, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
नीता मेस्त्री आपल्या दोन मुलांसह आणि दोन बहिणींच्या कुटुंबासोबत गुरुवारी (ता. १५ मे) रत्नागिरीत आल्या होत्या. माळनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये सर्व जण थांबले होते. शुक्रवारी (ता. १६) त्यांनी मूळ गाव देवाचे गोठणे येथे देवदर्शनासाठी भेट दिली होती.
शनिवारी (ता. १७) पहाटे सुमारे सहाच्या सुमारास नीता मेस्त्री अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.