(खेड)
कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन खेड (रजि.)च्या वतीने भंते करूणाज्योती महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक कोकण बौद्ध धम्म परिषद शनिवार, दि. १० मे २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड येथे संपन्न झाली.
या परिषदेला चिपळूण, रत्नागिरी, दापोली, गुहागर, मंडणगड, पोलादपूर या तालुक्यांतील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभा खेडचे अध्यक्ष मा. अरुणकुमार मोरे यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन त्रिरत्न बौद्ध महासंघ खेडचे चेअरमन मा. धम्मचारी शुभ्रकेतू यांच्या हस्ते पार पडले.
खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष देवानंद यांनी ध्वजगीत सादर केले. भंते करूणाज्योती महास्थवीर यांनी पुजा-पाठ, पंचशील, आणि ‘धम्म’विषयक देसना दिली. ‘सुरा मेरय मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी’ या विषयावर महाचर्चा झाली. यामध्ये सात तालुक्यांतील प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.
महाचर्चेत आदेश साळवी, दीपक निकम, धम्मभगिनी यशोश्री, ॲड. जयेश जाधव, श्रीधर सावंत, कु. स्वप्नाली रूके, सौ. गीता सावंत, सौ. प्रमिला कांबळे, सखाराम सकपाळ (मा. पोलीस पाटील), चंद्रकांत हळदे (पोलीस पाटील), सौ. दर्शना यादव, सौ. निर्मला मोरे, सौ. ज्योती कासारे, के. टी. गायकवाड गुरुजी, सखाराम जाधव, प्रभाकर लोखंडे, जगदीश जाधव, रमण तांबे, पवार संतोष, धर्मराज हळदे, राजेंद्र कासारे, देवेंद्र मोरे, मा. लोखंडे आदी उपस्थित होते.
संघासाठी गेली ४५ वर्ष कार्यरत असलेले खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबईचे माजी सरचिटणीस मा. डी. ए. जाधव यांनी परिषदेमध्ये महत्वाचा ठराव मांडला. या ठरावानुसार, जे संस्था किंवा त्यांचे घटक मद्यपान करणाऱ्या वा विकणाऱ्यांना सहकार्य करतात त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारवंत धम्मक्रांतीला बाधा निर्माण करतात, त्यामुळे अशा व्यक्ती वा संस्था अपात्र ठरविण्यात याव्यात, असा ठराव मंजूर करण्यात आला.
या परिषदेला वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा उर्फ विकास जाधव, ॲड. गीता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम जाधव, जिल्हा संघटक श्रीकांत सकपाळ, तालुका अध्यक्ष गिरीश गमरे आणि इतर कार्यकर्त्यांनी भेट दिली. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष सज्जन शिर्के व कोषाध्यक्ष सौ. रश्मी तांबे यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सचिन सयाजी मोहिते यांनी केले.
खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष मंदारजी हळदे यांच्या शुभेच्छापत्राचे वाचन करून उपस्थित मान्यवरांना सन्मानपत्र वाटप करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष अनिल पांडुरंग येसोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.