(रत्नागिरी)
शहरानजीक खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार तरुणींची सुटका केली. ही धाड मंगळवारी, 13 मे रोजी सायंकाळी 8.45 ते 9.50 या वेळेत टाकण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून गौरव लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्या आधारे नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपासून या लॉजच्या परिसरात २० ते २५ वयोगटातील तरुणी संशयास्पद परिस्थितीत फिरताना दिसत होत्या, त्यामुळे परिसरात अनैतिक कृत्य सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात होती. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने लॉजवर अचानक धाड टाकली. छाप्यादरम्यान, चार तरुणी मिळून आल्या, ज्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या मुंबईहून जबरदस्तीने देहविक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. लॉज चालक या तरुणींमार्फत अनैतिक व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दिनांक 13 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजवर छापा टाकण्यात आला. डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. छाप्यादरम्यान, चार महिलांना देहव्यवसायासाठी लॉजमध्ये आणण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी) हा मुख्य आरोपी म्हणून निष्पन्न झाला असून, त्यास पंचासमक्ष अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून संबंधित मुद्देमाल जप्त करून, पुढील कारवाईसाठी आरोपीस रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी लॉजवर छापा टाकल्यानंतर, त्या ठिकाणी चार तरुणी संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्या. चौकशीअंती, या तरुणींना देहव्यवसायासाठी मुंबईहून आणल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तातडीने त्यांची सुटका केली असून, लॉज चालकाविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात असा प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. राजेंद्र यादव यांच्यासह पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा डोमणे, पो.हवा शांताराम झोरे, पो.हवा बाळू पालकर, पो.हवा. प्रवीण खांबे, पो.हवा. गणेश सावंत, पो.हवा. सत्यजित दरेकर, म.पो.हवा. श्रीमती वैष्णवी यादव आदी सहभागी होते.

