(राजापूर / प्रतिनिधी)
माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी राजापूर तालुक्यातून 1,576 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,550 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा एकूण निकाल 98.35 टक्के लागला आहे. तालुक्यातील विविध शाळांमधून मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती विद्यामंदिर पाचल हायस्कूलचा अर्थव मोरे आणि अर्जुना माध्यमिक विद्यालय, कारवली हायस्कूलची आदिती वायबसे यांनी 98.60% गुण मिळवत तालुक्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
प्रमुख शाळांचा निकाल व प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी:
राजापूर हायस्कूल, राजापूर (निकाल : 99.46%)
-
वैष्णवी नंदकुमार चव्हाण – 97.60%
-
गायत्री दिलीप कदम – 95%
-
स्नेहा उदय गुरव – 92.40%
नवजीवन हायस्कूल, राजापूर (निकाल : 100%)
-
अलिझा तेहरीम खान – 94.60%
-
तेहरीन शब्बील नाखरेकर – 90.40%
-
सालिहा अकिल मुजावर – 84.60%
सरस्वती विद्यामंदिर, पाचल (निकाल : 99.21%)
-
अर्थव संदीप मोरे – 98.60%
-
अनिष सुरेश घुगरे – 95.60%
-
अनामिका चिले व अलिना चौगुले – 95%
अर्जुना माध्यमिक विद्यालय, कारवली (निकाल : 100%)
-
आदिती अश्रुबा वायबसे – 98.60%
-
सोहम सचिन भोजने – 92.80%
-
सई वरेकर व भूषण फटकारे – 87.80%
अन्य शाळांचा निकाल संक्षेपात:
-
जिजामाता विद्यामंदिर, रायपाटण – 100% (तक्ष चव्हाण – 84.80%)
-
न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर – 100% (विराज घाडी, चिंतन डोर्लेकर – 80%)
-
निर्मला भिडे जनता विद्यालय, कोंड्ये – 100% (तन्वी चव्हाण – 93.60%)
-
बा.ल.साठे माध्यमिक विद्यालय, देवोगोठणे – 100%
-
गांगेश्वर विद्यालय, ससाळे – 93.93%
-
नॅशनल इंग्लिश स्कूल, राजापूर – 100% (आरमान मुल्ला – 95.40%)
-
मार्डन हायस्कूल, साखरीनाटे – 100% (सानिया खाडू – 95%)
-
जुवाठी हायस्कूल – 100% (आदिती सूर्यवंशी – 93.80%)
-
नाटे विद्यामंदिर, नाटे – 98.57%
-
सागवे हायस्कूल – 100% (आर्या राणे – 93.80%)
-
आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर, भू – 100% (स्वामिनी लागवणकर – 97.80%)
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शाळांचे हार्दिक अभिनंदन! तालुक्यातील सर्व शाळांनी उत्तम निकाल नोंदवत गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.