(देवरूख / सुरेश सप्रे)
महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पीएस बने इंटरनॅशनल स्कूल साडवली या शाळेने आपली १००% निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र CBSE परीक्षा 2025 परीक्षेत 100% निकाल देऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत संस्थेच्या भांडूप येथील पराग इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नेही 100% निकाल लागला असून आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.
पी.एस.बने इंटरनँशनल स्कूल ने आपल्या यशाची परंपरा कायम राखत सलग तिसऱ्या वर्षी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १००% इतका लागला आहे. प्रशालेत प्रथम क्रमांक इला आंबेकर हिने ९७.८०% गुण मिळवत पटकवला आहे. तर द्वितीय क्रमांक : तनिष्का झगडे हिने ९५.००% व तृतीय क्रमांक: सृष्टी कदम हिने ९४% गुण मिळवून प्राप्त केला आहे.
या वर्षी निकालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा अधिक मार्क मिळवले व ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे शाळेचे संस्थापकीय अध्यक्ष बाळकृष्ण बने व सचिव माजी आमदार सुभाष बने व पीएस बने स्कूलचे संचालक माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना महत्त्व देऊन विद्यार्थी विकास घडवण्याचे कार्य हे केवळ योग्य व्यवस्थापन, शिक्षकांची मेहनत, पालकांचे सहकार्य यामुळे घडून येते आणि म्हणूनच शाळेला हे यश संपादन करता आले. असे मत यावेळी संस्थेचेवतीने रोहन बने यांनी व्यक्त केले.
या यशामुळे पीएस बने इंटरनॅशनल स्कूल साडवलीने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपली विश्वासार्हता आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे.