(जैतापुर/ वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील नाटे नगर विद्या मंदिर शाळेचा एकूण निकाल- 98.57 टक्के लागला असून 90.80% गुण मिळवून मुग्धा लाड प्रथम आली आहे. द्वितीय – बसणकर सूरज संदेश – 90.60
तृतीय – बसणकर प्रिया सुयोग – 89.60 असे अनुक्रमे आले आहेत.
दहावी परीक्षेला एकूण 70 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे सरपंच तथा संस्था प्रमुख संदीपजी बांदकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. रविंद्र जाधव सर, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रविण होलम व पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी श्री. राऊत भाऊ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.