(चिपळूण)
सुप्रिया लाइफसाइन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत झाटे यांना ‘ग्लोबल हेल्थकेअर लीडर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फॉरट्युना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५ या भव्य कार्यक्रमात मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला.
दापोली तालुक्यातील असोंड गावचे रहिवासी असलेले डॉ. झाटे हे औषधनिर्मिती उद्योगातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि दूरदृष्टीसंपन्न नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जीनोटॉक्सिसिटी या विषयात त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली असून, २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी फार्मास्युटिकल उद्योगात गुणवत्ता व्यवस्थापन, नियामक धोरणे आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षण यांसारख्या क्षेत्रात प्रभावी कार्य केले आहे.
त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुप्रिया लाइफसाइन्सने अमेरिका, युरोप, ब्राझील, चीन आणि इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आपली उत्पादनं यशस्वीरित्या पोहोचवली आहेत. उद्योगातील कार्यप्रवाह जागतिक मानकांनुसार सुधारण्यात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाळण्यात डॉ. झाटे यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
हा पुरस्कार म्हणजे फार्मास्युटिकल क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची पावती असून, जागतिक आरोग्यसेवेत भारताच्या भूमिकेला चालना देणारे त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

