(चिपळूण)
तालुक्यातील खडपोली एमआयडीसीलगत एका
खासगी जागेत असलेल्या भंगार गोदामास आग लागली. या आगीत गोदामातील विविध साहित्य जळून खाक झाल्ल्याने मोठे नुकसान झाले. पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
खडपोली एमआयडीसी लगत खासगी जागेतील भंगार गोदामास आग लागल्याची माहिती मिळताच मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी चिपळूण पालिकेच्या अग्निशमन बंबास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या दरम्यान परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी पालिकेचा अनिशमन बंब पोहोचल्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या कामी पालिकेचे मनोज फरांदे, देवदास गावडे, प्रतीक घेवडेकर, महेंद्र लोहकरे यांनी मदत केली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत गोदामातील काही साहित्य जळून खाक झाले होते. या अधीत गोदामाच्या शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षात खडपोली आणि खेर्डी यमआयडीसीतील भंगार गोदामास आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.