(मुंबई)
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित आणि स्वायत्त महाविद्यालये तसेच मान्यताप्राप्त संस्थांमध्ये या वेळापत्रकानुसार प्रवेश घेतला जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अनुषंगाने राबविण्यात येणारी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १३ मे २०२५ पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि वापरकर्ता-स्नेही ठेवण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mu.ac.in/admission भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि अर्ज भरण्याची पद्धत समजून घेण्यासाठी वेबसाईटवर व्हिडिओ मार्गदर्शिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेचे तपशीलवार वेळापत्रक:
-
ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादरीकरण: १३ मे ते ०३ जून २०२५
-
कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी (विभाग स्तरावर): ०९ जून २०२५, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
-
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर: १० जून २०२५, संध्याकाळी ६ वाजता
-
तक्रारी नोंदविण्याची अंतिम मुदत: १२ जून २०२५, दुपारी १ वाजेपर्यंत
-
प्रथम गुणवत्ता यादी जाहीर: १७ जून २०२५, संध्याकाळी ६ वाजता
-
प्रथम गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे शुल्क भरणे: १८ जून ते २१ जून २०२५, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
-
द्वितीय गुणवत्ता यादी जाहीर: २४ जून २०२५, संध्याकाळी ६ वाजता
-
द्वितीय गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे शुल्क भरणे: २५ जून ते २७ जून २०२५, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
-
वर्गांची सुरुवात: ०१ जुलै २०२५
मुंबई विद्यापीठाने सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.