(खेड)
तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गंगाराम केंडे (वय ५६, रा. आंबवली, भिंगारवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केंडे यांनी आपल्या गुरांच्या गोठ्यातील लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवले.
या घटनेची माहिती मृताचे चुलत भाऊ धोंडीराम नामदेव केंडे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

