(खेड)
येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. 12 वी विज्ञान मधील विध्यार्थिनी सौलीहा तांबे हिने टार्गेट प्रकाशनामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या PCM व PCB Mock test मध्ये PCB ग्रुप मध्ये 200 पैकी 179 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याबद्दल टार्गेट प्रकाशनामार्फत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन तिचा सन्मान करण्यात आला याबद्दल सौलीहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सौलीहाला प्रशालेतील मकरंद दाबके, पंकज हालके, अभिजीत शेळके, अश्विनी पाटील, सतीश माने, साधना थोरात यांनी मार्गदर्शन केले. सौलीहाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

