(खेड)
खोपी प्रभागातील तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद बिजघर कोंड शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी विजय सकपाळ होते. शिक्षण प्रेमी तुकाराम पार्टे यांनी श्रीफळ वाढवून शिक्षण परिषदेचे उद्घाटन केले सुरुवातीला बिजघर कोंड वाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सरला मावळी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिजघर कोंड शाळेच्या शिक्षिका जया दोरकर यांनी केले.
तिसंगी हायस्कूलचे शिक्षक शैलेश सकपाळ, बीजघर नंबर एक शाळेचे विजय सकपाळ व तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सरला मावळी, शिक्षिका जया दोरकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर, नारायण शिरकर, रोहन देवकते, सुनिल जंगम, अंकिता भोसले, तृप्ती काताळे, अनुराधा शिंदे, ज्योती सांगळे व बिजघर कोंड येथील ग्रामस्थ बंधू भगिनींनी मेहनत घेतली.

