( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीत अनाधिकृत वाळू उपसा होत असून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच तहसीलदार यांचे निलंबन करण्यात यावे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम पवार यांनी निवेदन दिले असून या निवेदनात संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीत किमान दहा वाळू व्यवसायिक सक्शन पंपाने बेसुमार वाळू उपसा करीत असून याबाबत तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी लेखी निवेदन देऊनही वाळू चोरीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेले नाही असे म्हटले आहे. तसेच संगमेश्वर तहसीलदार यांची तात्काळ निलंबन कारवाई करण्यात यावी. करजुवे खाडीतील होड्या, पंप पाईप, जेसीबी, वाळू साठे आदी साहित्य जमा करण्यात यावे अशी निवेदनात म्हटले आहे.
करजुवे येथील बेसुमार चोरट्या वाळू उपशामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून वाळू चोरी होत आहे येथील तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी परशुराम पवार यांनी केली आहे