(देवळे / प्रकाश चाळके)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नदी, नाले, ओढे, धबधबे आणि समुद्रकिनारी जाणे टाळावे, दरडप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच वीज कोसळण्याच्या शक्यतेमुळे झाडांखाली आणि विद्युत खांबांजवळ थांबू नये, असे आवाहन आमदार सामंत यांनी केले आहे.
आमदार किरण सामंत यांनी पावसाच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरून न जाता हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क : जिल्हा नियंत्रण कक्ष 1077 | पोलीस 100 | आपत्कालीन सेवा 108

