.(जाकादेवी / वार्ताहर)
शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित जिल्हा परिषद सेवा योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा सन 2024/25 मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करबुडे मुळगाव शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. संजीवनी सुनिल गावडे हिने तालुका गुणवत्ता यादीत १० वा क्रमांक प्राप्त केला आहे.
केंद्रस्तर चाळणी परीक्षेतून तालुका अंतिम निवड परीक्षेसाठी या शाळेतून संजीवनी प्रमाणेच इयता सातवीतून समृद्धी नेवरेकर, वैष्णवी सोनवडकर, रिया कळंबटे, दिव्या तांबे, सृष्टी सोनवडकर, संस्कार नेवरेकर, दुर्गेश गोताड, गणेश धनावडे व इयत्ता चौथीतून तनिष्का तांबे व स्वरूप तांबे यांची निवड झाली होती.
संजीवनीला मुख्याध्यापक श्री. दत्ताराम मुंडेकर, वर्गशिक्षक श्री. शैलेश शिंदे सर, सौ. वृषाली राऊत मॅडम व श्री प्रशांत दुडये यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच करबुडे मुळगाव शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सर्व पालक व ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे.