(तरवळ / अमित जाधव)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २७ व २८ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथील कै.डॉ नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुंड खाराभूमी ता.जी.रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा १४,१७,१९ वर्षे वयोगटामध्ये मुलगे व मुली अशी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर स्पर्धा या जिल्हास्तरीय असल्यामुळे सर्व खेळाडूंनी व मार्गदर्शक शिक्षक यांनी तयारीने येण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ विजय शिंदे यांनी केले आहे. दिनांक २७ नोव्हेंबर रोजी १४ व १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. तर दिनांक २८ नोव्हेंबर रोजी १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या खेळविल्या जातील. याची सर्व शाळा व महाविद्यालयातील प्रशिक्षक व खेळाडूंनी नोंद घ्यावी, अधिक माहिती साठी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चे सचिव सिद्धेश गुरव ८७७९६६९४९६ आणि मालगुंड प्रशालेचे क्रीडा शिक्षक रूपेश तावडे ९४०३५०६७३७ व संजय थोरात ७३८७८६६२७५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

