(गणपतीपुळे / वैभव पवार)
नंदादीप नेत्रालय, जलजीविका संस्था रत्नागिरी व केळकर क्लिनिक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर केळकर क्लिनिक, मालगुंड येथे नुकतेच संपन्न झाले. या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा सुमारे 71 रुग्णांनी लाभ घेतला.
या सर्व रुग्णांना नंदादीप नेत्रालयातर्फे एक कुपन देण्यात आले. या कुपन द्वारे शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना चष्मा सवलतीच्या दरात मिळणार आहे.तसेच मोतीबिंदू, काचबिंदू इ शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर त्या खर्चात सवलत मिळणार आहे.ज्या रुग्णांची नेत्र तपासणी नॉर्मल आहे, त्यांचे नातेवाईक सदर कुपन वापरु शकतात. सदर शिबिर यशस्वी केल्याबद्दल मालगुंड येथील केळकर क्लिनिकतर्फे डॉ.संतोष केळकर यांनी नंदादीप नेत्रालय व तंत्रज्ञ, जलजीविका संस्थेचे चिन्मय दामले व त्यांचे सहकारी, तसेच सर्व रुग्णांचे आभार मानले आहेत.