(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पटवर्धन हायस्कूलच्या कु. खुशी विद्याधर कांबळे हिने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे आयोजित राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत अफलातून कामगिरी करत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने शंभर पैकी ९२ गुण मिळवून आपली उल्लेखनीय विद्वत्ता सिद्ध केली आहे.
खुशीच्या या घवघवीत यशामागे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मीना ताडे व केंद्र संचालक अजित मुळीक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, संस्था पदाधिकारी श्रीराम भावे तसेच अन्य सदस्यांनी खुशीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनात पर्यवेक्षक अमर लवंदे सर व पाचवी ते आठवीच्या पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर मॅडम यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले. हिंदी विषयाच्या मार्गदर्शक शिक्षकांनीही खुशीच्या या अपूर्व यशाचे विशेष कौतुक केले आहे.
खुशीच्या चमकदार यशामुळे शाळेचा मान उंचावला असून, भविष्यात ती आणखी नवी शिखरे सर करेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सध्या खुशीच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.